! महाराष्ट्र गोसेवा आयोग आयोजित "ई गोकट्टा" मार्गदर्शन, माहिती, कार्यांची ओळख, भेटी, चर्चा, संवाद, मंथन, विचार, प्रेरणा, सल्ला, शिफारसी मुक्त संवादपीठ : दर महिन्याच्या १ तारखेला (नियमितपणे) वेळ : सायं. ०७:३० ते ०९:०० येथे क्लिक करून आपण आपला सहभाग नोंदवू शकता      ! गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रति दिन प्रती पशू रु. ५०/- अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणेची मुदत दिनांक १५/०६/२०२५ ते ३०/०६/२०२५ पर्यन्त वाढविण्यात येत आहे.       ! दिवाळी साठी गोमय दिवे , गोमय लक्ष्मी मूर्ती, गोमय साबण, उटणे यांसारखी गोमय नैसर्गिक उत्पादने तयार करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळा, खाजगी संस्था, कारखाने किंवा व्यक्तींनी त्यांची माहिती येथे क्लिक करून भरावी.

आमचे नेतृत्त्व

यशस्वी मार्गदर्शन करणारे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, व व्यवस्थापकीय संचालक हे महाराष्ट्रातील गायींच्या आर्थिक प्रगतीसाठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गोपालन क्षेत्रात सशक्त बदल घडून येत आहेत.

अधिक माहिती

गोसंरक्षण — आपली सामूहिक जबाबदारी

गोसंगोपन, गोसंवर्धन आणि मुख्यत्वे गोसंरक्षण हे किती महत्वाचे आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.

एवढेच नाही तर प्राकृतिक शेती या विषयांवर जी कार्यशाळा आदरणीय राज्यपाल देवव्रतजी यांनी मांडली त्यामध्ये देखील शेवटचे समाधान हे देशी गोवंशच आहे याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की देशी गोवंशाचे पालन, पोषण व संरक्षण हे झालेच पाहिजे आणि गोहत्या बंदी कायदा कडक पद्धतीने महाराष्ट्रात लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी येणार्‍या काळात अधिक प्रभावीपणे करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ठरविले आहे.

— महाराष्ट्र गोसेवा आयोग

❄️ तीव्र हिवाळ्यातील गोवंशाची घ्यावयाची काळजी

डिसेंबर व जानेवारी या महिन्यात गोवंशासाठी आवश्यक व्यवस्थापन, संरक्षण आणि आरोग्य उपाय

डिसेंबर आणि जानेवारी हे तीव्र हिवाळ्याचे महिने पूर्ण वाढ झालेल्या गोधनासाठी आरोग्य विकासाचे असले तरी वाढीची वासरे आणि वय झालेला गोवंश यासाठी प्रतिकूल ठरतात. त्यामुळे योग्य नियोजन व व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.

  • 1. थंडीपासून संरक्षण: गोणपट पडदे, फ्लेक्स कपडा, सुरक्षित शेकोटी, गरम पाणी, अतिरिक्त खुराक आणि कोरडी बसण्याची जागा उपलब्ध करणे.
  • 2. फुफ्फुसदाह/ठसकणे: कमी प्रतिकारशक्ती असलेल्या गोवंशासाठी वनस्पतीजन्य प्रतिजैवक (Ginger, Oregano, Thyme, Tea tree तेल) पशुवैद्यकाने वापरावेत.
  • 3. रात्री निरीक्षण: दर 4 तासांनी पाण्याची भांडी, गव्हाण, मलमूत्र, थंडीमुळे कुडकुडणारे गोवंश अशी सर्व तपासणी शांततेत करावी.
  • 4. हिरव्या चाऱ्याची लागवड: रब्बी हंगामासाठी हिरवा चारा मोठ्या प्रमाणात पेरणी करणे आवश्यक.
  • 5. माजाची लक्षणे: शरीर वजन योग्य असणाऱ्या गायी/कालवडींमध्ये हिवाळ्यात माजाची लक्षणे दिसतात — देशी पैदास करणे योग्य.
  • 6. प्रजनन ऋतू: माजावर येणाऱ्या गोवंशासाठी शुद्ध देशी गोवंशाचे रेत वापरूनच रेतन करावे.
  • 7. त्वचेची निगा: कास, शेपटीची आतील बाजू सुकल्यास नारळ तेल, निर्जंतुक व्हॅसलीन किंवा लोणी-हळद वापरावी.
  • 8. ओलाव्यापासून संरक्षण: गोवंश भिजू नये आणि गोठ्याबाहेर पाणी साठणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी.
  • 9. आहार वाढ: दैनंदिन आहारात किमान 10% वाढ करावी जेणेकरून शरीरातील तापमान संतुलित राहील.
  • 10. वाहतूक: अत्यावश्यक सोडल्यास हिवाळ्यात रात्री गोवंशाची वाहतूक टाळावी.
  • 11. निवारा/आच्छादन: जाड कपडे, फरशीवर रबरी चटई, काँक्रीटवर पुठ्ठे — पूर्ण बंदिस्त निवारा आवश्यक.
  • 12. तापमान नोंद: 5% गोवंशांचे तापमान, श्वास व नाडी दररोज तपासावी व नोंद करावी.
  • 13. थंड वारे: थंड हवेचे झोत असल्यास गोवंशाला मुक्त संचारासाठी बाहेर सोडू नये.
  • 14. नोंदी अद्यावत: सर्व माहिती व नोंदवह्या नियमित अद्यावत कराव्यात.
  • 15. प्रशिक्षण: गोआधारित नैसर्गिक शेती, नवीन गोमय उत्पादन निर्मिती व चर्चासत्रासाठी हा काळ सर्वोत्तम.
  • 16. गोपर्यटन/साहित्य: गो आधारित तांत्रिक साहित्य, वाचनालय, विक्री केंद्र यांसाठी नियोजन करावे.
  • 17. सन्मान नामांकन: महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मानासाठी नामांकन सादर करावे.
  • 18. हवामान पूर्वसूचना: हवामान बदलाची माहिती घेत सतर्क राहावे.
  • 19. आपत्ती व्यवस्थापन: पाऊस, चक्रीवादळ, हिमवृष्टीसाठी प्रतिबंधात्मक उपाय तयार ठेवावे.
  • 20. जनसहभाग: सर्व गोपालक, पशुवैद्यक, गोरक्ष यांच्या सूचना घेऊन सुधारणा कराव्यात.

संकलन व निर्मिती — डॉ. नितीन मार्कण्डेय (सदस्य, गोसेवा आयोग)

बातम्या
  • No announcements available.
महत्वाच्या सुचना
महत्वाच्या लिंक्स

माहिती कक्ष

- महाराष्ट्र गोसेवा आयोग

इतिहास आणि स्थापना
इतिहास आणि स्थापना
अधिक माहिती
योजना
उद्दिष्टे
अधिक माहिती
महाराष्ट्रातील मेंढ्या
महाराष्ट्रातील नोंदणीकृत गोशाळा
अधिक माहिती
पुरस्कार आणि मान्यता
शासकीय व अशासकीय यंत्रणा
अधिक माहिती
भगवान श्रीकृष्ण
गोपाष्टमीचा आनंद साजरा करा

गोपाष्टमीचा आनंद साजरा करा । भारतीय संस्कृतीत पहिला गोपालक म्हणजे गोविंद, तोच श्रीकृष्ण ...

लोकरी उत्पादने
चारा पिके डायरी
अधिक माहिती

महाराष्ट्र गोसेवा आयोगा बदल अधिक माहिती


Card image cap
आयोगाचे कार्यक्षेत्र

महाराष्ट्रातील 34 जिल्हामधील नोंदणीकृत असलेल्या गोशाळा


अधिक माहिती
Card image cap
आयोगाच्या विविध योजना

देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.

अधिक माहिती
Card image cap
गोसेवा आयोगाची संरचना

संबंधित कायदे अंमलबजावणी: आयोग गोवंशाच्या हत्या विरोधी कायदे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करतो.

अधिक माहिती
Card image cap
कार्यरचना

शासकीय सदस्य आणि अशासकीय सदस्य नावे व पद

अधिक माहिती

इतर माहिती